जबुटीकाबा हे झाड ब्राझीलमध्ये आढळून येते आणि याला निसर्गाच्या अनोख्या चमत्कारामध्ये सामील केले जाते. या झाडाचे फळ थेट खोडांवर उगवते. याचमुळे हे जगातील सर्वात अनोखे झाड ठरते. मिनास जेराइस आणि साओ पावलोमध्ये आढळून येणारे हे फळ स्वादिष्ट असण्यासह औषधीय गुणांनी देखील युक्त आहे.
जबुटीकाबाला ब्राझिलियन द्राक्षं देखील म्हटले जाते. हे मिनास जेराइस आणि साओ पावलोच्या दक्षिण भागांमध्ये मिळते. याचे फळ छोटे आणि गोल असते, ज्याचा व्यास 3-4 सेंटीमीटर असतो, यात 1-4 मोठी बीज, दाट जांभळ्या रंगाची मोठी साल असते. याची रचना जेलीसारखी असते, ज्यामुळे हे खास ठरते. सर्वसाधारणपणे हे झाड वर्षात एकदा किंवा दोनदा फळधारणा करते.
या झाडाला नियमित पाणी मिळाल्यास ते उष्णकटिबंधीय भागांमध्ये वारंवार फळ देऊ शकते. जबुटीकाबाचा स्वाद इतका चांगला असतो की मिनास जेराइसमध्ये हजारो स्ट्रीट वेंडर याला छोट्या जाळीदार बॅगमध्ये विकतात, रस्ते आणि फुटपाथ याच्या जांभळ्या सालांनी रंगून जातात, यातून याची लोकप्रियता दिसून येते. ताजे फळे बहुतांश लोक तसेच खातात, परंतु हे फळ झाडावरून तोडल्यावर 3-4 दिवसांनी खराब होऊ लागते.
याच्या छोट्या शेल्फ-लाइफमुळे ते संबंधित भागाबाहेर ताज्या स्वरुपात मिळविणे अवघड आहे. याचमुळे लोक याला जाम, टार्ट, मजबूत वाइन आणि लिकर निर्मितीसाठी वापरतात. जबुटीकाबाचे औषधीय लाभही कमालीचे आहेत. उन्हात सुकविण्यात आलेल्या याच्या सालीचा काढा पारंपरिक स्वरुपात खोकला, दमा आणि टॉन्सिलच्या सुजवरील उपचारावत वापरला जातो. यातील अँटीऑक्सिडेंट आणि सूजविरोधी घटक कॅन्सरशी लढण्यास मदत करतात. हे फळ आरोग्य आणि स्वादाचे अनोखे मिश्रण आहे. परंतु जबुटीकाबा ब्राझीलच्या अनेक हिस्स्यांमध्ये उगवते, पण मिनास जेराइसशी याचे नाते सर्वात दाट आहे. मिनास जेराइसच्या कोंटागेम शहराच्या प्रतीक चिन्हावर जबुटीकाबाचे झाड दिसून येते.
जबुटीकाबा फेस्ट
ब्राझीलच्या सबारा सिटीत दरवर्षी जबुटीकाबा उत्सव साजरा करण्यात येतो. येथे लोक याचे फळ, व्यंजन आणि संस्कृतीचा जल्लोष करतात. हा उत्सव स्थानिक लोक आणि पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. जबुटीकाबाचे अनोखे वैशिष्ट्या याचे झाड आहे. ज्यावर फळ थेट खोडालाच येते. फळलेले झाड पाहण्यासाठी पर्यटक दूरवरून येत असतात. ब्राझीलचे उबदार हवामान आणि मिनास जेराइसची माती याच्या पिकासाठी परिपूर्ण ठरते.









