उन्हाळ्यात शरीराला सतत पाण्याची गरज भासत असते.अशावेळी आपल्या आहारात देखील हायड्रेटेड फूड असायला हवे.पण उन्हाळ्यात
जास्तीत कोल्ड्रिंक्स पिण्यावर भर असतो जे शरीरासाठी अपायकारक ठरू शकते.पण जर तुम्ही कोल्ड्रिंक्सऐवजी फळांचा ज्यूस घेतला तर ते नक्कीच हेल्दी ठरतं.शिवाय शरीराला जास्तीत जास्त हायड्रेट ठेवतं. आज आपण उन्हाळ्यात कोणत्या फळांचे ज्यूस फायदेशीर ठरतात हे जाणून घेऊयात.
उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. वजन कमी करण्यापासून ते शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यापर्यंत असे अनेक फायदे उसाचा रस पिल्यानं व्यक्तीला होत असतात.
अनेक लोक उन्हाळ्यात टरबूजाचं मोठ्या प्रमाणात सेवन करतात. या फळात अनेक पोषक घटक असल्यानं त्यामुळं शरीरात आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यास मदत होते. टरबूजासोबक दही किंवा मधाचं सेवन केल्यास त्यामुळं आरोग्याला अधिक फायदा होतो.
लिंबू सरबत हे एनर्जी ड्रिंक आहे. लिंबूमध्ये सी, बी, रिबोफ्लेविन, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळं उन्हाळ्यात लिंबाचा रस पिल्यानं पोटांचे विकार आणि अशक्तपणाची समस्या कमी होण्यास मदत होते.
नारळाच्या पाण्याच्या सेवनामुळं उन्हापासून आणि उष्णतेपासून आराम मिळतो. नारळ पाणी हे अतिरिक्त साखर आणि जास्त अँटिऑक्सिडंट्स असलेले ऊर्जा पेय आहे. नैसर्गिक शर्करा आणि हायड्रेटिंग व्यतिरिक्त, नारळाच्या पाण्यात अनेक महत्वाचे पोषक घटक असतात. त्यामुळं उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात नारळपाणी पिणं पसंत करतात.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









