कोल्हापूर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम समजल्या जाणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील एक भाजी विक्रेता थेट सरपंच पदावर बसला आहे. डोंगर कपारीत असणाऱ्या वरेवाडीतील आनंदा रामचंद्र भोसले यांनी जनसुराज्य पक्षाच्या विश्वास बाबू भोसले यांचा पराभव केलेला आहे.
आनंदा भोसले हा पहिल्यापासूनच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून आनंद भोसले यांची पंचक्रोशीत ओळख आहे. बांबवडे परिसरात भोसले यांचे भाजी विक्रीचे दुकान असून यापूर्वीही ते डेप्युटी सरपंच म्हणून निवडून आले होते. आनंद भोसले यांनी शिवाजी विद्यापीठातून पत्रकारिता विभागातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र पत्रकारेशी जुळवून न घेता त्यांनी थेट भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यातूनच त्यांनी संपर्क तयार करून आपल्या गावाच्या सरपंच पदावर विराजमान झाले आहेत.
आनंदा भोसले हे ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून सरपंच पदाच्या निवडणूक रिंगणात होते. त्यांना 391 मते मिळाली असून त्यांच्या विरोधात जनसुराज्येचे विश्वास भोसले यांना 330 मते मिळाली आहेत. आनंद भोसले यांचा 60 मतांनी विजय झाला.
Previous Article‘आप’ची महाराष्ट्रात धडक; ‘या’ गावात आम आदमी पक्षाचा सरपंच
Next Article इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई सरपंचपदी विराजमान









