मनोज जरांगे-पाटील यांची मोठी घोषणा : मराठा आंदोलन अधिक तीव्र होणार
प्रतिनिधी/ मुंबई
‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आजपासून पाणी घेणे देखील बंद करणार आहे, अशी मोठी घोषणा मनोज जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना रविवारी केली आहे. त्यामुळे मराठा आंदोलन अधिक तीव्र होणार आहे. रविवारी त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. यावेळी जरांगे-पाटील यांची मुंबईतील आझाद मैदानावर जे. जे. हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या पथकांनी तपासणी केली. यावेळी डॉक्टरांनी जरांगे-पाटील यांचा रक्तदाब आणि ब्लड शुगर तपासणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे यांनी ब्लड शुगर चाचणीस नकार दिला. तरीही डॉक्टरांनी त्यांची इतर तपासणी केली. तपासणीनंतर जरांगेंची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, ‘आम्हाला मुंबईतील श्रीमंत आणि गरीब सगळे जण मदत करत आहेत. जे कोण महाराष्ट्रातून इकडे येत आहेत त्यांनी वाशी, मशीद बंदर आणि इतर ठिकाणी आपली वाहने पार्किंग करावी. याठिकाणी वाहनांना जागा नाही. जे जे जेवण वाटप करत आहेत, त्यांना सांगतो तुम्ही काय ते वाटप करत या. पण, थेट ट्रक इथे आणू नका. अन्नछत्र सुरू केले आहे, त्यासाठी पैसे मागू नका’, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले. राजकीय नेते, मंत्री हे नासके असतात. हैदराबाद आणि साताऱ्याचे गॅझेट पुरावे म्हणून आहेत. आमची मागणी संविधानाला धरून आहे. मराठे आता घरी थांबणार नसून पुढच्या शनिवार आणि रविवारी यापेक्षा आणखी मोठी गर्दी होईल’, असेही मनोज जरांगे म्हणाले.
हैद्राबाद आणि सातारा गॅजेटिअरवर विस्ताराने चर्चा : विखे पाटील
सरकारने मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकांचा सपाटा सुरू असून, रविवारी पुन्हा एकदा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले की, प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतफत्वात उपसमिती काम करीत आहे. शनिवारी जरांगे यांनी दिलेल्या प्रस्तावावर रविवारच्या बैठकीत चर्चा सकारात्मक झाली हैद्राबाद आणि सातारा गॅजेटिअर बाबत विस्ताराने बैठकीत चर्चा झाली. यातील त्रफटी विचारात घेऊन अंमलबजावणी करताना कायदेशीर अडचणी येवू नयेत म्हणून राज्याचे अॅडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.
यावेळी विखे पाटील म्हणाले की, ‘माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि उपसमितीमधील सदस्यांनी काल मनोज जरांगे यांची भेट घेतली. शासनाकडून जी कार्यवाही सुऊ आहे त्याची कल्पना त्यांना दिली. यावेळी त्यांच्याही मुद्द्यांसदर्भात चर्चा झाली. हैदराबाद आणि सातारा गॅझेटियरची अंमलबाजावणी झाली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, आम्ही या गोष्टी तपासून घेत आहोत’, असे त्यांनी सांगितले.
राधाकृष्ण विखे पाटील यांचा शरद पवारांवर हल्लाबोल
राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ” मला शरद पवारांचं आश्चर्य वाटतं. ते चार वेळ राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच पेंद्रातही मंत्री होते. त्यांच्या काळात ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करावा, असे त्यांना का वाटले नाही? या मुद्द्यावरून राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने करू नये,” असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.
तसा निर्णय एकही दिवस टिकणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि सरकारडून कोणत्याही हालचाली दिसत नाही आहे. त्यामुळे, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वफत्तवाहिनीशा बोलताना सरकारची भूमिका काय आहे स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हणाले, मनोज जरांगे-पाटील उपोषण कऊन ज्या मागण्या करत आहेत त्याच्याकडे आम्ही सकारात्मकने पाहात आहोत. ते मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा अशी मागणी केली जात आहे. पण न्यायालयाचे काही निर्णय आलेले आहेत. या निर्णयांचा आपल्याला अवमान करता येणार नाही. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन अशी मागणी केली जात असेल आणि लोकांना खुश करण्यासाठी तसा निर्णय सरकारने घेतलाच तर तो एकही दिवस टिकणार नाही, असे स्पष्ट मत फडणवीस यांनी व्यक्त केले. तसेच कायद्याच्या बाहेर निर्णय झालाच तर मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना तयार होईल, असेही मत फडणवीस यांनी सांगितले.
भुजबळांनी ओबीसी नेत्यांची आज बैठक बोलावली
ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे-पाटील यांचे आमरण उपोषण सुऊ आहे. दुसरीकडे जरांगेंच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच काही जिह्यांत साखळी उपोषण देखील सुऊ केले आहे. त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ हे ओबीसींसाठी मैदानात उतरले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांची आज सोमवारी मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी ओबीसी नेत्यांनी मुंबईत यावे आणि बैठकीत सहभागी व्हावे, असा संदेश भुजबळ यांनी दिला आहे.









