दापोली प्रतिनिधी
नगरपंचायतीच्या काळकाईकोंड येथील पाण्याच्या टाकीजवळील फिल्टर टँक रूमधून 35 हजार 500 रूपयांचे साहित्य चोरीला गेल्याची तक्रार पाणी पुरवठा कर्मचारी स्वप्नील महाकाळ यांनी येथील पोलीस ठाण्यात केली आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार 2 डिसेंबर रात्री 10 ते 17 डिसेंबर दुपारी 12 या वेळेत दापोली-काळकाई कोंड टाकीजवळील फिल्टर टँक रूममधून 1 हजार रूपये किमतीचा सहा इंची स्विच व्हॉल, 2 हजार रूपयाचे चार इंची 2 टेल पिस, 2 हजार रूपयांचा आठ इंची टेल पीस, 2 हजार रूपयांचा सहा इंची जीपी जॉइं&ट, 7 हजार रूपयांचे चार इंची सीआयडी जॉईट 14, 4 हजार रूपयांचे सहा इंची बेंड 2, 1 हजार 500 रूपयांचा सहा इंची श्यू बेंड, 8 हजार रूपयांचा सीआरआय पंप 50 एचपी, 5 हजार रूपयांचा चार इंची स्वीच व्हॉल, तर 3 हजार रूपयांचे आठ इंची प्लँच 2 असे एकूण 35 हजार 500 रूपयांचे साहित्य चोरीला गेले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरटय़ाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल वैशाली सुकाळे करीत आहेत.









