कोल्हापूर / सुधाकर काशीद :
कोल्हापुरात नवरात्र, दसरा सण या निमित्ताने दसरा चौकाचे स्थान, महात्म्य खूप मोठे आहे. कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक परंपरांचे जतन या ठिकाणी होते. प्रजेला म्हणजे सर्व कोल्हापूरकरांना त्यासाठी सोने लुटणे म्हणजे आपट्याची पाने लुटण्यासाठी खुले आमंत्रण दिले जाते.
दसरा चौक दसरा सणादिवशी कोल्हापूरकरांच्या गर्दीत अक्षरश? फुलून गेलेला असतो .आबाल वृद्ध आपल्या कुटुंबासह तेथे आलेले असतात .नव्या कपड्यात सजलेले असतात . काहींनी फेटे बांधलेले असतात . फेट्यात नवरात्रीच्या घटातील कोवळे कोंब त्रुयासारखे झुलत असतात .

सर्व शासकीय अधिकारी नेतेमंडळी व दसरा चौकात उपस्थित असतात . मावळतीच्या क्षणाला नवीन राजवाड्यावरून मेबॅक या देखण्या जर्मन मेड मोटारीतून शाहू छत्रपती महाराज संभाजीराजे ,मालोजी राजे लोकांचे नमस्कार स्वीकारत दसरा चौका देतात .शमीच्या पानाचे पूजन करतात . आणि बंदुकीची फैर झाडली जाताच तिन्ही बाजुने उभारलेले कोल्हापूरकर धावत पळत येऊन शमीच्या पानांची म्हणजे प्रति कात्मक सोन्याच्या पानाची लूट करतात .थोडी धक्काबुक्की जरूर होते .पण काही वेळानंतर एकमेकाला खूप आदराने सोन्याची पाने देऊन ठसोने घ्या सोन्यासारखे रहा‘ म्हणत शुभेच्छांची देवाघेवाण होते .काही क्षणापूर्वी आपसात केलेली धक्काबुकी त्या क्षणीच विसरली जाते .
कोल्हापुरात 100 वर्षाहून अधिक काळ हा दसरा सोहळा साजरा होतो .कोल्हापूर दसरा समितीच्या वतीने त्याचे आयोजन केले जाते .यावर्षीचे वैशिष्ट्या हे की या वर्षीपासून या दसरा सोहळ्याला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाला आहे .आणि दसरा समिती व राज्य शासन यांच्या वतीने यावर्षी पहिला दसरा सोहळा साजरा होत आहे .या सोहळ्याची उंची त्यामुळे अधिकच वाढली आहे .
कोल्हापुरातला हा दसरा सोहळा चौफाळ्याच्या माळावर म्हणजे आत्ताच्या दसरा चौकात साजरा होतो .आता हा माळ म्हणजे दसरा चौक आणि हा दसरा चौक म्हणजे कोल्हापूरचा सुवर्ण मध्य आहे .चौफळ्याचा माळ दसरा चौक म्हणून ओळखला जात आहे .या परिसरात चाफ्याची झाडे खूप होती म्हणून त्याची जुनी ओळख चौफाळ्याचा माळ अशीच आहे .
नवरात्र ,दसरा सण या निमित्ताने या दसरा चौकाचे स्थान महात्म्य खूप मोठे आहे. कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक परंपरांचे जतन या ठिकाणी होते .आणि प्रजेला म्हणजे सर्व कोल्हापूरकरांना त्यासाठी खुले आमंत्रण दिले जाते .

या निमित्ताने दसरा चौकात सूर्य मावळतीच्या क्षणाला आपट्याच्या पानांचे पूजन महाराजांच्या हस्ते होते . तलाठ्यालाही तो मान असतो . सोहळ्याला मंत्री आमदार खासदार जिल्हाधिकारी, पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस प्रमुख, महापालिका आयुक्त व सर्व शासकीय अधिक्रायांना निमंत्रित केले जाते .त्यासाठी दसरा चौकात मोठा मंडप उभारलेला असतो .पोलीस आणि प्रादेशिक सेनादलाचा वाघवृंद तेथे स्वागतासाठी उभा असतो .
एका बाजूला सर्व मुख्य अधिकारी ,नेते मंडळी निमंत्रक व दसरा चौकाच्या तिन्ही बाजूला कोल्हापूरकर उभे असतात .सहकुटुंब आलेले असतात . आपट्याच्या पानाचे पूजन शाहू महाराज व त्यांचा परिवार करतो . करतात व इश्रायाच्या बंदुकीची फैर झाडली की लोक ही आपट्याची पाने सोने म्हणून लुटतात. या सोहळ्यासाठी अंबाबाई ,भवानी व गुरू महाराजांची पालखी या दसरा चौकात आलेली असते .
यापुढचे विशेष असे की ,अंबाबाईची पालखी परत जाताना सिद्धार्थ नगरातून जाते .सारे सिद्धार्थ नगर या पालखीच्या स्वागतासाठी सजलेले असते .पालखीला पायघड्या घातलेल्या असतात .साक्षात देवीच या नगरात प्रत्येकाच्या घरासमोर वर्षातून एकदा येते .त्यामागे खूप मोठा सामाजिक आशय आहे .
तिथून पालख्या पंचगंगा नदी तीरावरील मंदिरात जातात .तेथे राजघराण्यातील व्यक्तींच्या समाध्या आहेत .तेथे पालखीचे पूजन होते व समाध्यांना आपट्याच्या पानाने पुजले जाते . दसरा सोहळ्या नंतर शाहू महाराज, संभाजी राजे , मालोजीराजे छत्रपती भवानी मंडपातील सदरेवर थांबून लोकांच्या सदिच्छा स्वीकारतात . या सोहळ्याला धार्मिक आणि त्याहून मोठा असा सामाजिक आशय आहे . आणि कोल्हापूरकरांचा हा सोहळा दरवर्षी आणखी नव्या थाटाने साजरा होतो हे ठरलेलं आहे .यावर्षी शासन या पारंपरिक सोहळ्यात सहभागी होणार आहे .








