कर्नल अन् कनिष्ठ स्तरीय अधिकाऱ्यांच्या गणवेशात नाही बदल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सैन्यामध्ये ब्रिगेडियर आणि त्याहून वरच्या पदावरील अधिकाऱ्यांसाठी मंगळवारपासून एकसारखा गणवेश लागू करण्यात आला आहे. अलिकडेच सैन्याच्या कमांडर्सच्या परिषदेत चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला होता. हा नियम सर्व अधिकाऱ्यांवर लागू होणार आहे, मग तो कुठल्याही कॅडरचा असो किंवा त्याची कधीही नियुक्ती झालेली असो. तर कर्नल आणि त्याहून कनिष्ठ स्तरीय अधिकाऱ्यांच्या गणवेशात मात्र कुठलाच बदल करण्यात आलेला नाही
या निर्णयाच्या अंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांची टोपी, खांद्यावरील बॅज, गोरगेट पॅच (कॉलरवर लावला जाणारा पॅच), बेल्ट आणि बूट एकसारखे असतील. तर फ्लॅग रँकच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशातही किरकोळ बदल करण्यात आला आहे.
हा निर्णय वरिष्ठ नेतृत्वादरम्यान सेवा प्रकरणांमध्ये सामान्य ओळख अन् दृष्टीकोनाला चालना देण्यासाठी घेण्यात आला आहे. एकसारखा गणवेश सर्व वरिष्ठ स्तरीय अधिकाऱ्यांना समान ओळख देणार आहे.
सैन्यात सर्वात मोठी रँक फील्ड मार्शल आहे. यानंतर जनरल, लेफ्टनंट जनरल, ब्रिगेडियर, कर्नल, लेफ्टनंट कर्नल, मेजर, कॅप्टन, लेफ्टनंट, सुबेदार मेजर, सुबेदार, नायब सुबेदार, हवालदार, नायक लान्स, नायक अशी पदे असतात. देशात आतापर्यंत दोनच फील्ड मार्शल झाले आहेत.