
बेळगाव : य् ाgनियन जिमखाना आयोजित जिमखाना चषक निमंत्रितांच्या फ्रेंडशिप तिरंगी चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युनियन जिमखाना संघाने एनएचव्हीपीएस बेंगळूर संघाचा 75 धावांनी पराभव करून फ्रेंडशिप तिरंगी चषक पटकावला. सुमेध बडकर सामनावीर तर अथर्व बेनके मालिकावीर ठरले. य् ाgनियन जिमखाना मैदानावरती खेळविण्यात आलेल्या या अंतिम सामन्यात युनियन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 22 षटकात 6 गडी बाद 178 धावा केल्या. त्यात अथर्व बेनकेने 17 चौकारासह 67 चेंडूत आक्रमक 103 धावा करून शतक झळकवले. त्याला प्रतिक कराडेने 14 तर साईराज साळुंखेने 13 धावा करून सुरेख साथ दिली. बेंगळूरतर्फे प्रत्यक्ष याने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एनएचव्हीपीएस बेंगळूर संघाचा डाव 20.5 षटकात 103 धावात आटोपला. त्यात राहुल गौडाने 2 चौकारासह 16 धावा केल्या. जिमखानातर्फे सुमेध बडकर व स्वरुप साळुंखे यांनी प्रत्येकी 3 तर लक्ष शहाने दोन गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे युनियन जिमखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सचिव प्रसन्ना सुंठणकर, बेंगळूरचे प्रशिक्षक विनोद एम. ए. यांच्या हस्ते विजेत्या युनियन जिमखाना, उपविजेत्या बेंगळूर संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर सुमेध बडकर जिमखाना, उत्कृष्ट फलंदाज अक्षित शिवण्णा बेंगळूर, उत्कृष्ट गोलंदाज स्वरुप साळुंखे जिमखाना तर मालिकावीर अथर्व बेनके जिमखाना यांना चषक देऊन गौरविण्यात आले.यावेळी मिलिंद चव्हाण, सचिन साळुंखे, महांतेश देसाई व सुजित शिंदोळकर आदी उपस्थित होते.









