वार्ताहर/ सांबरा
मुतगे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सन 1985 -86 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पाटीलनगर मुतगा येथे नुकताच पार पडला. माजी शिक्षक व्ही. ए. पाटील व बसवंत कोंडुस्कोप यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुमन पाटील होत्या. मुलींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुऊवात झाली. प्रताप पाटील यांनी दीपप्रज्वलन केले. भारत मातेच्या पूजनानंतर उपस्थित पाहुण्यांची ओळख भाऊराव पाटील यांनी करून दिली.
तब्बल 40 वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी एकत्र येत असल्याचे पाहून मला अतिशय आनंद होत आहे असे मत माजी शिक्षक हणमंत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी व्ही. ए. पाटील यांनी विचार मांडले. यावेळी अनेकांची भाषणे झाली. माझी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विद्यार्थी दशेतील विविध किस्से सांगितले. विद्यार्थ्यांच्यावतीने उपस्थित गुऊजींना शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. दुपारच्या सत्रात स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी शेवटच्या सत्रात मनोरंजनात्मक व प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व विद्यार्थी
विद्यार्थिनींनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी केले.









