बेळगाव : फ्रेंड्स फुटबॉल क्लब आयोजित रौप्य महोत्सव निमित्त फ्रेंड्स चषक आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन फाईव्ह साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एम व्ही हेरवाडकरने एमव्हीएमचा तर महाविद्यालयीन गटात इस्लामियाने लिंगराज संघाचा पराभव करून फ्रेंड्स चषक पटकाविला. टर्फ फुटबॉल मैदानावर आयोजित या फुटबॉल स्पर्धेत आंतरशालेय विभागात पहिल्या उपांत्य फेरीच्यासामन्यात एमव्ही हेरवाडकरने एमव्हीएम संघाचा 1-0 असा निसटता पराभव करून तर दुसऱ्या सामन्यात एमव्हीएमने मदनी संघाचा टायब्रेकरमध्ये 3-2 अशा गोल फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात एम व्ही हेरवाडकर व एमव्हीएम यांच्यात सामना झाला. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण दोन्ही संघांना अपयश आले. त्यामुळे पंचानी टाय ब्रेकर निमाचा वापर केला. त्यामध्ये एम व्ही हेरवाडकरने 2-1 अशा गोल फरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. हेरवाडकर तर्फे प्रथमेश अणवेकर व श्रेयस डिगसकर यांनी गोल केले. एमव्हीएम तर्फे राकेशने गोल केला. महाविद्यालयीन विभागात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातून लिंगराज संघाने केएलई इंजिनिअरिंग संघाचा टायब्रेकर मध्ये 2-1 असा पराभव केला.
लिंगराज तर्फे संकेत व अर्णव यांनी प्रत्येकी एक गोल केला. तर केली तर्फे तर्फे अभिलाषणे केला. दुसरा उपांत्य फेरीच्या सामन्यात इस्लामियाने जीआयटी अ संघाचा एक 1-0 असा निसटता पराभव केला. इस्लामियाच्या रिहान बेपारीने एकमेव गोल अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यास सिंहाचा वाटा उचलला. अंतिम सामन्यात इस्लामीया संघाने लिंगराज संघाचा 1-0 असा निसटता पराभव करून विजेतेपद पटकाविले. सामन्याच्या 17 व्या मिनिटाला इस्लामियाच्या रिहान बेपार्रींच्या पासवर आदर्श गणेश करने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघानी गोल करण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण त्यांना अपयश आले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे रोमारियो, हर्ष जॉन. एम एम कोतवाल, इरफान बेपारी साकीब बेपारी, अमोघ, अमीन पिरेजादे, अभिषेक चेरेकर, वैभव नेसरीकर, गायकवाड, श्रवण आदी मान्यवरांच्या हस्ते शालेय विजेत्या एम व्ही हेरवाडकर संघाला आकर्षक चषक व रोख 10 हजार ऊपये, उपविजेत्या एमव्हीएम संघाला 5 हजार ऊपये रोख व चषक ,महाविद्यालय विजेत्या इस्लामिया संघाला 20 हजार ऊपये रोख व चषक तर उपयोजित या लिंगराज संघाला 10 हजार ऊपये रोख व चषक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून अमीन पिरजादे व अभिषेक चेरेकर यांनी काम पाहिले.









