कोल्हापूर / रुपाली चव्हाण :
एनसीसी कॅम्प जवळून विद्यापीठकडे जाणारा मार्ग आह़े. त्यामुळे विद्यार्थाची येजा असत़े. तसेच हॉटेल व्यावसायिकांची वर्दळ आह़े या चौकातील सिग्नलस् कित्येक दिवसापासून बंद स्थितीत आह़े सायबरपासून एनसीसी भवनकडे जाताना रस्त्याच्या डावीकडील बाजूचे फूटपाथ ठराविक ठिकाणी उघडे आहेत़ त्यामुळे पादचाऱ्यांना जाण्यायेण्यासाठी त्रास होत़ो या चौकात सिग्नल बंद अवस्थेत आहेत़ त्यामुळे दुचाकी, चारचाकी अवजड वाहने कसेही चालवत आह़े फुटपाथवर गाड्या पार्कीग केले आह़े चौकात फुटपाथवर जाहिरातीचे फलक बॅनर लावले आहेत़ हा रिंगरोड असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा रस्त्याचा कडा दिसण्यासाठी रेडियम लावण्यात याव़े वेग मर्यादेसाठी पांढरे पठ्ठे मारण्यात याव़े.
- एसएससी बोर्ड चौक
या चौकातून मोरेवाडी हॉकी स्टेड़ियम, संभाजीनगर, कळंबा शिवाजी विद्यापीठ, सायबर एसएससी बोर्डकडे जाणारा मार्ग आह़े झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पठ्ठे अस्पष्ट दिसत आहेत़ रस्त्याच्या कडेला दुतर्फा असणारे पांढंरे पठ्ठे अस्पष्ट झाल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचा डोळयावर प्रकाश पडून वाहनधारक़ांचे नियंत्रण सुटत़े या भागात सकाळी, सांयकाळी पायी चालणाऱ्या वयोवृध्द मध्याम वयीन व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या खूप आह़े रस्त्याच्या दुतर्फा चेंबर ठराविक ठिकाणी ओपन आह़े
हा कॅम्पस एरिया तसेच रिंगरोड असल्याने अवजड वाहने रात्री 7 नंतर येतात जातात.त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे या चौकात सिग्नल चालू स्थितीत पाहिज़े झेब्रा क्रॉसिंग पठ्ठे नाह़ीत. उघड्यावर पडलेले फुटपाथ यांचे काम प्रशासनाने लवकरात लवकर करावे अशी मागणी नागरिकातून होताना दिसत आह़े
-सौरभ यादव (वाहनधारक)








