5 बोगी रुळावरून घसरल्या
वृत्तसंस्था/ बारगड
ओडिशाच्या बारगड जिह्यातील संभारधाराजवळ चुनाखडी घेऊन जाणाऱ्या मालगाडीच्या पाच बोगी ऊळावरून घसरल्या. ही गाडी डुंगरीहून बारगडकडे जात होती. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यापूर्वी ओडिशामध्येच तीन दिवसांपूर्वी बालासोरजवळ झालेल्या अपघातात जवळपास 280 जणांचा मृत्यू झाला होता.
ओडिशात मालगाडीला नव्याने झालेल्या अपघातानंतर ईस्ट कोस्ट रेल्वेने एक निवेदन जारी केले आहे. हे पूर्णपणे खासगी सिमेंट कंपनीचे नॅरोगेज साइडिंग आहे. कंपनी स्वत: रोलिंग स्टॉक, इंजिन, वॅगन्स, टेन ट्रॅक (नॅरो गेज) यासह सर्व पायाभूत सुविधांची देखभाल करते. ही मालगाडी डुंगरी लाइम माईन्स येथून एसीसी सिमेंट प्लान्टकडे जात होती, असे स्पष्ट केले आहे.









