कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये एस टी महामंडळाच्या दोन वाहकांमध्ये शुल्लक कारणावरून फ्रिस्टाईल हाणामारी झाली. ब्रेकडाऊन झालेल्या एसटी गाडी मधील प्रवाशांना दुसऱ्या गाडीत घेण्याच्या कारणामधून ही हाणामारी झाली. भोगावतीमध्ये वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर प्रवाशासमोरच हा प्रसंग घडला. राधानगरी आगाराच्या अशोक कांबळेंना संभाजीनगर आगाराचे वाहक डी. सी. गुरव यांनी मारहाण केली. एस टी कर्मचारी अशोक कांबळे यांनी पोलिसात केली तक्रार दाखल केली आहे. गुरव यांच्याकडे एका संघटनेच्या आगार पातळीवरच्या पदाचा कार्यभार आहे. मारहाणीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून, यांसदर्भात पोलिसांमध्ये तक्रारही दाखल झाली आहे. या प्रसंगानंतर प्रवाश्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.









