वृत्तसंस्था/ लास वेगास, अमेरिका
लास वेगास येथे सुरू झालेल्या 16 खेळाडूंच्या फ्रीस्टाइल बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या आर. प्रज्ञानंदला मॅग्नस कार्लसनसोबत एकाच गटात स्थान मिळाले आहे, तर अर्जुन एरिगेसी आणि विदित गुजराती यांना अन्य एका गटात एकत्र ठेवण्यात आले आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला मॅग्नस कार्लसन पुन्हा एकदा विजेतेपदाचा संभाव्य दावेदार म्हणून सुऊवात करेल. या स्पर्धेच्या प्रसिद्धीसाठी अनेक स्पर्धापूर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन त्यात एनबीए खेळाडूंचा सहभाग राहिला. ही स्पर्धा बुधवारी उशिरा सुरू झाली असून या स्पर्धेत एकूण 7 लाख 50 हजार अमेरिकन डॉलर्सची इनामे ठेवण्यात आली आहेत आणि विजेत्यासाठी 2 लाख डॉलर्सचे इनाम ठेवलेले आहे.
प्रत्येक गटात आठ खेळाडू आहेत आणि आघाडीचे चार खेळाडू पुढील टप्प्यात जातील, उर्वरित चार एकमेकांविऊद्ध खेळतील. विश्वविजेता डी. गुकेश या स्पर्धेत सहभागी झालेला नाही. कारण तो सुमारे एक महिन्यानंतर ग्रँडमास्टर टूरच्या मुख्य स्पर्धेत खेळणार आहे. 19 वर्षीय प्रज्ञानंद आपली मोहीम उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हविऊद्ध सुरू करेल, ज्याच्यावर क्रोएशियातील झाग्रेब येथे झालेल्या ग्रँड चेस टूरच्या मागील आवृत्तीत संघर्ष करण्याचा प्रसंग आला होता.
कार्लसन पहिल्या फेरीत पहिल्या आवृत्तीचा विजेता जर्मनीच्या विन्सेंट केमरशी खेळेल. अमेरिकन हान्स निमन फ्रीस्टाइल बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत असून तो सलामीच्या सामन्यात एरिगेसीशी सामना करेल, तर गुजरातीची लढत अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाशी होईल. पहिल्यांदाच, महिला खेळाडू कझाकस्तानची बिबिसारा असाउबुयेवा हिला जागतिक स्तरावरील दिग्गज खेळाडूंविरुद्ध स्पर्धा करण्यासाठी समाविष्ट करण्यात आले आहे.
फ्रीस्टाईल बुद्धिबळ हे फिशर रँडम बुद्धिबळ किंवा चेस 960 ला दिलेले एक नवीन नाव आहे, जिथे खेळाच्या सुऊवातीला सोंगाट्यांचे स्थान हवे तसे बदलले जाते. यात ठरविलेल्या ओपनिंगच्या आधारे खेळ केल्याने सामने बरोबरीत सुटण्याचे प्रकार घडत नसल्याने आणि सुऊवातीपासूनच सामने रंगतदार होत असल्याने ही आवृत्ती लोकप्रिय होत आहे.









