कोल्हापूर
कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. पाच ते सहा जणांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय चौकात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. यामध्ये दोन महिलांचाही समावेश होता. हाणामारीचे कारण अस्पष्ट आहे. पण घटनास्थळी पोलिस त्वरीत दाखल झाले. घटनास्थळी पोलीस दाखल होताच सर्वांनी पळ काढला.









