नवी मुंबई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्यांची सुटका करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा “पूर्णत: अस्वीकार्य” आणि “पूर्णपणे चुकीचे” असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उर्वरित मारेकऱ्यांना सोडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अस्वीकार्य आणि पूर्णपणे चुकीचा आहे. काँग्रेस पक्ष निषेध करतो. सुप्रीम कोर्टाने या मुद्द्यावर भारताच्या आत्म्याशी सुसंगतपणे कृती केली नाही हे सर्वात दुर्दैवी आहे,” असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
Previous Articleआशा सेविका सौ.लक्ष्मी परब यांचे निधन
Next Article तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महादेव गुरव यांचे निधन









