यंदा राज्यातले सण निर्बंधमुक्त होणार आहेत. दहिहंडी आणि गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटवल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकित घेण्यात आला आहे. कोकणासाठी एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश सरकारच्यावतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे धुमधडाक्यात दहिहंडी आणि गणेशोत्सव साजरा होणार आहे. कायदा-सुव्यवस्था राखून हे उत्सव साजरे झाले पाहिजेत अशा सूचना पोलीस, जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून राज्यात कोणतेच सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे झाले नव्हते. यंदा मात्र ते होणार आहेत. कोरोना रूग्णांची संख्या जरी वाढत असली तरी त्याचा प्रार्दुभाव मात्र कमी आहे. त्यामुळे यंदाची वारीही निर्बंधमुक्त झाली आहे. याच पार्श्वभूमी निर्बंधमुक्त राज्य करण्यात आलं आहे.
हेही वाचा- President Election Result Live: पहिल्या फेरीत द्रौपदी मुर्मूं आघाडीवर
गणेशोत्सव, दहीहंडीसह इतर सण व्यवस्थित पार पाडले जावेत यासाठी येण्या-जाण्याच्या मार्गावरील खड्डे दुरुस्तीच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. त्याचबरोबर मंडप आणि इतर परवानग्या सुटसुटीत व्हाव्यात यासाठी एकखिडकी योजना आणि ऑनलाईन पद्धतीनं परवानग्या देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासाठी कुठल्याही क्लिष्ट अटीशर्ती नसणार, यासाठी कुठलेही चार्जेस द्यावे लागणार नाही, याची सूट देण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








