पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
वृत्तसंस्था/ कोची
स्वातंत्र्यसेनानी पी. गोपिनाथन नायर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले आहे. ते दीर्घकाळापासून आजारी होते. पी. गोपिनाथन नायर हे गांधीवादी विचारांचे पाईक होते आणि त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यासह अनेक मान्यवरांनी गोपिनाथन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
भारताच्या स्वातंत्र्यलढय़ातील योगदान तसच गांधीवादी विचारांबद्दल अतूट प्रतिबद्धतेसाठी गोपिनाथन नायर यांचे सदैव स्मरण केले जाणार असल्याचे मोदींनी बुधवारी म्हटले आहे. भारत छोडो आंदोलनात भाग घेणारे गोपिनाथन यांनी शांतता आणि अहिंसक चळवळीत सामाजिक आणि अध्यात्मिक नेतृत्व करणाऱया लोकांना प्रेरित केल्याचे उद्गार आरिफ मोहम्मद खान यांनी काढले आहेत.









