सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
Freedom fighter Kirtanguru Shriram Zarapkar passed away!
विश्वहिंदु परिषदे चे माजी जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे जिल्हाध्यक्ष, स्वातंत्र्य सैनिक श्रीराम झारापकर यांचे आज सकाळी १० वाजता दिर्घ आजाराने निधन झाले. एक ज्वलंत हिन्दुत्व आणि अत्यंत ज्ञानवंत कीर्तनकार म्हणुन ते परिचीत होते .त्यांनी आतापर्यंत २०० कीर्तनकार घडवले. त्यात ३२ महिला कीर्तनकारांचा तर १० दलीत कीर्तनकारांचा सामावेश आहे. आणिबाणी काळात त्यांनी १७ महिने तुरुंगवास भोगला होता. त्यांच्यामागे पत्नी, २ मुलगे , सुन, नातवंडे असा परिवार आहे.









