स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धगधगते व्यक्तिमत्त्व उलगडणार ; श्री बालाजी थिएटर्स निर्मीत नाट्यप्रयोग
वेंगुर्ले (वार्ताहर)-
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे प्रगल्भ विचार आजच्या पिढीला समजावेत या उद्देशाने श्री श्री बालाजी थिएटर्स निर्मित ‘सागरा प्राण तळमळला’ हा मोफत नाट्यप्रयोग वेंगुर्ले नगरपरिषदेच्या मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात आज रविवारी संध्याकाळी ७.३० वाजता होणार आहे. या नाटकाच्या उदघाटनास शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संध्याकाळी ६.३० वाजता उपस्थित राहून आयोजकांना मदत करायची आहे. तसेच या नाट्यप्रयोगाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यसेनानी , राजकारणी, समाजसुधारक, कवी, अभ्यासक, कुटुंबप्रमुख या अपूर्व भूमिकांमधून तात्याराव सावरकरांचा संपूर्ण जीवन प्रवास पाहण्याचा सुवर्णयोग. मधुसूदन कालेलकरांच्या सिद्ध हस्तलेखणीच एक अनोख असे सागरा प्राण तळमळला हे नाट्यपुष्प आहे.
भारत सरकार संगीत अकादमी पुरस्कार प्राप्त कुमार सोहोनी यांचे बेजोड दिग्दर्शन, प्रसिध्द नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांची नेपथ्य कल्पकता आणि सिनेनाट्य अभिनेत्यांचा उत्कृष्ठ अभिनय एकाच रंगमंचावर पाहण्याची सुवर्ण संधी नागरिकांना मिळणार आहे. या सिने कलाकार सुनील गोडसे, संध्या म्हात्रे, सुरभी भावे, अंगद म्हसकर आदी कलाकार काम करणार आहेत.









