प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी संचालित लोककल्प फौंडेशन आणि संकल्प हॉस्पिटलच्या सहकार्याने एप्रिल महिन्यात चोर्ला येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरातील 50 हून अधिक व्यक्तींना नेत्र दोष आढळला होता.
या सर्वांना दि. 14 मे रोजी मोफत चष्मे वितरित करण्यात आले. लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली लोककल्प फौंडेशनच्या माध्यमातून विविध आरोग्य तपासणी शिबिरे नियमित आयोजित केली जातात. या शिबिरांचा दुर्गम भागातील नागरिकांना फायदा होत आहे. या चष्मे वाटप कार्यक्रमास लोककल्प फौंडेशनचे स्वयंसेवक वामन पेडणेकर, सुहासिनी पेडणेकर आणि अनंत गावडे व इतर उपस्थित होते.









