सावंतवाडी
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने दिनांक 11 जुलै रोजी सकाळी 11 वाजता लोकमान्य सावंतवाडी क्षेत्रीय कार्यालय येथे लोकमान्य वेल्थ ॲडव्हायजर या मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये लोकमान्य सोसायटीमध्ये लोकमान्य वेल्थ ॲडव्हायजर म्हणून काम करण्याच्या संधीबद्दल नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उद्योग तज्ञांकडून गुंतवणूक योजनांची विक्री, विमा उत्पादन विक्रीद्वारे कमाई, म्युच्युअल फंड वितरणाद्वारे कमाई कशी करावी, तसेच निवृत्तीनंतरही उत्पन्न कसे वाढवावे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मोफत सेमिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.









