प्रतिनिधी / बेळगाव
लोककल्प फौंडेशनने प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. तेजस्वी तिर्थल्ली आणि डॉ. नूतन कंग्राळकर यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्मयातील कालमणी गावात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रम म्हणून नेत्रतपासणी शिबिर आयोजित केले होते. डॉक्टरांनी डोळय़ांच्या समस्या तसेच मोतीबिंदू आणि डोळय़ांशी संबंधित इतर आजार आणि समस्या तपासल्या. या शिबिरात सहभागी होणाऱया लोकांना लोककल्प फौंडेशनतर्फे मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. शिबिरात लहान मुलांसह जवळपास 200 ग्रामस्थ सहभागी झाले होते.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजित गरगट्टी यांच्या नेतृत्वाखाली लोककल्प फौंडेशन खानापूर तालुक्मयात गेल्या वर्षभरापासून कार्यक्रम राबवित आहे.
या उपक्रमामुळे गावांतून आदर व आपुलकी निर्माण झाली आहे. या उदात्त उपक्रमांबद्दल ग्रामस्थांनी लोककल्प फौंडेशन आणि लोकमान्य सोसायटीचे आभार मानले. लोककल्प फाऊंडेशनने दत्तक घेतलेल्या 32 गावांपैकी कालमणी हे एक गाव आहे.
लोककल्पचे स्वयंसेवक संतोष कदम, निखिल अर्जुनवाडकर, अनंत गावडे, प्रितेश पोटेकर आणि सुहासिनी पेडणेकर कार्यक्रमाला उपस्थित होते.









