ओटवणे । प्रतिनिधी
ओटवणे गावात भर दिवसा ते सुद्धा भरवस्तीत कोल्ह्याचा मुक्त संचार चर्चेचा विषय ठरला. ओटवणे पोलिस पाटील शेखर गावकर आपल्या घरी जाताना त्यांच्या दृष्टीस हा कोल्हा पडला. त्यानंतर त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये हा कोल्हा कैद केला. यापूर्वीही त्यांना तीन कोल्ह्यांचे दर्शन झाले होते. निवृत्त विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक यांनी हा कोल्हा असल्याचे सांगितले.









