Free Jaipur Foot and Palm for Handicapped
इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्यावतीने दिव्यांगांसाठी लवकरच मोफत जयपुर फूट आणि तळहात शिबिराचे आयोजन करण्यात येणार असुन या शिबिरासाठी गरजूं दिव्यांगांनी नोंदणी करण्याचे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षादर्शना रासम यांनी केले आहे.
इनरव्हील क्लब हा सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेला क्लब आहे. गेल्या ४० वर्षांपासून या क्लबच्यावतीने सावंतवाडी शहर व तालुका परीसरात शैक्षणिक सामजिक आरोग्य आदी समाजपयोगी उपक्रम सातत्याने राबवित आहे. याच उपक्रमांतर्गत दिव्यांगांसाठी जयपूर फूट तसेच तळहाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.
यापूर्वीही २०१८ मध्ये अशाच प्रकारे दिव्यांगांसाठी शिबिराचे आयोजन करून ३२ जणांना इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्यावतीने दिव्यांगांना मोफत जयपुर फूटचे वितरण करण्यात आले होते. या शिबिरात जयपूर फूट सोबत ज्यांना गरज आहे. अशा दिव्यांगांना तळहातही मोफत देण्यात येणार आहे .
या शिबिरासाठी गरजूंनी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी दर्शना रासम 9404778151 आणि भारती देशमुख 8669347700 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या डॉ शुभदा करमरकर यांनी केले आहे.









