वेंगुर्ले (वार्ताहर)-
Free high blood pressure, heart disease and diabetes screening camp on January 8 in Vengurle
स्व. डॉ.अतुल मुळे स्मरण समितीतर्फे ग्रामीण रुग्णालयात शिबीराचे आयोजन / Vengurle
स्व. डॉ अतुल मुळे स्मरण समिती, वेंगुर्ले यांच्यावतीन कै. डॉ. अतुल मुळे यांच्या स्मरणार्थ वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय येथे रविवार दि. 8 जानेवारी रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 यावेळेत मोफत आरोग्य शिबीरात फक्त उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेह रुग्णांसाठी खास शिबीर मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यांत आले आहे.
या मोफत आरोग्य शिबीरात पुणे येथील तज्ञ, अनुभवी, नामवंत हृदयरोग (कार्डीओलॉजी) डॉ. चंद्रकांत चव्हाण व छातीरोग तज्ञ (चेस्ट फिजीशियन) डॉ. संजय पवार कडून मोफत वैद्यकिय तपासणी व सल्ला देण्यात येणार आहे. तसेच गरजेनुसार रुग्णांची मोफत ई.सी.जी. व रक्त तपासणी केली जाणार आहे. तसेच उपलब्दतेनुसार औषधे देण्यात येणार आहेत. या शिबीरात सहभागी झालेल्या लाभार्थींना सकाळी 8.30 ते 10 वाजेपर्यत नाश्ता देण्यात येणार आहे.
हृदयरोग, उच्चरक्तदाब व मधुमेह हे आजार असलेल्या रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेण्यासाठी येताना आल्याकडील सर्व जुने रिपोर्ट व प्रिस्क्रिप्शन घेऊन यावेत.









