बेळगाव :
सादसंगत गुरुद्वारा बेळगाव शाखेतर्फे रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दि. 9 रोजी करण्यात आले आहे. गोवावेस येथील सादसंगत गुरुद्वारा (डीपी हायस्कूलच्या मागे) येथे सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत शिबिर होणार आहे. यावेळी त्वचारोग तपासणी करून डॉक्टर सल्ला देणार आहेत. गरजुंनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सादसंगत गुरुद्वारा बेळगाव शाखेतर्फे गुरु नानक यांची 556 वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने प्रभातफेरी झाली. गोवावेस येथील गुरुद्वारापासून सुरुवात करून आरपीडी सर्कल, पहिले रेल्वेगेट, बी. एस. सी. मॉल, मिलेनियम गार्डनमार्गे गुरुद्वारा आवारात प्रभातफेरीची सांगता करण्यात आली. प्रभातफेरीमध्ये शीख बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









