मालवण | प्रतिनिधी
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हयातील मच्छिमार समाजासाठी मोफत वैद्यकीय तपासणी आरोग्य शिबीराचे आयोजन देवगड, वेंगुर्ला व मालवण या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत करण्यात आले आहे.बुधवार ०८ ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय, देवगड सकाळी १० ते सायं. ५ वा., दि. १० ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय, सकाळी १० ते सायं. ५. वा., दि. १४ ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय,मालवण सकाळी १०. ते सायं. ५.वाजता हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.जास्तीत जास्त मच्छिमारांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा. कॅम्पमध्ये सहभागी होऊन आरोग्यविषयक मोफत तपासणी करावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यवसाय सिंधुदुर्ग यांनी केले आहे.









