बेळगाव :
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सीएसआर अंतर्गत लोककल्प फाऊंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील तळवडे गावामध्ये मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरासाठी केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटलचे सहकार्य लाभले. या शिबिराचा 45 हून अधिक ग्रामस्थांनी लाभ घेतला. यावेळी प्राथमिक चिकित्सा तसेच रक्तदाब व अन्य चाचण्या करण्यात येऊन शिबिरार्थींना सल्ला देण्यात आला. आयुर्वेदिक हॉस्पिटलचे डॉ. राज जोशी, डॉ. तरुण पवार यांनी रुग्णांची तपासणी केली. त्यांना श्रीधर के. आणि नारायण यांचे सहकार्य लाभले. लोककल्पतर्फे संदीप पाटील उपस्थित होते.









