लहान मुलांचे आयुषमान कार्डही दिले जाणार बनवून
आचरा प्रतिनिधी
त्रिंबक येथे रविवार 15 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत लहान मुलांकरिता मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन हार्मोनि मेडिकेअरचे डॉ सिद्धू सकपाळ यांनी त्रिंबक टेंब बाजार येथे केले आहे. या शिबिरात बालरोगतज्ञ् येऊन मुलांची तपासणी करणार आहेत. आयुषमान भारत योजनेबद्दल अजूनही ग्रामीण भागातील नागरिकांना पूर्णपणे माहिती नाही या योजनेच लाभ होण्यासाठी यावेळी या शिबिरात लहान मुलांचे आयुषमान कार्ड व महात्मा फुले योजना याचे नोंदणी करून घेतली जाणार आहे. व त्याविषयी माहिती देण्यात येणार आहे. तसेच उपस्थित पालकांची तपासणी करून आवश्यक असल्यास मोफत कार्डीओग्राम काढून देणार आहेत. या शिबिराचा सर्व ग्रामस्थानी व त्यांच्या लहान बालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ सिद्धू सकपाळ यांनी केले आहे.









