श्री ऑर्थो हॉस्पिटलतर्फे संचालक डॉ. देवगौडा यांची माहिती
बेळगाव : कॉलेज रोडवरील श्री ऑर्थो हॉस्पिटलतर्फे डॉक्टर दिनाचे औचित्य साधून मोफत फॅमिली हेल्थकार्ड जनसेवेत येणार आहे. तसेच ज्येष्ठ डॉक्टरांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ. देवगौडा इमागौडानवर यांनी दिली. ते म्हणाले, कोणत्याही कुटुंबाला अपघात आणि आरोग्यविषयक आजारांपासून संरक्षण मिळावे, तसेच अतिरिक्त खर्च टाळावा या हेतूने हे हेल्थकार्ड सुरू केले आहे. या अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, सवलतीच्या दरात चाचण्या व तपासण्या अशा सुविधा मिळतील. एकदा हेल्थकार्ड बनविल्यानंतर रुग्णाच्या मोबाईलवर त्याच्या आरोग्याच्या नोंदी त्याला उपलब्ध होतील. या कार्डमुळे सवलतीसह आरोग्य सेवा व जर दुर्घटना घडली तर 48 तासांच्या आत मोफत सेवा रुग्णाला मिळू शकतील. त्याचबरोबर आभा कार्डसाठी सरकारने बेळगाव शहराची पायलट स्टडीसाठी निवड केली आहे. त्याबद्दलही श्री ऑर्थो काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. यासाठी रुग्णाला नावनोंदणी करता येईल किंवा हेल्थकार्ड अथवा आभा फॉर्म भरण्यासाठी क्युआर कोड स्कॅन करता येईल किंवा 9606963117 वर व्हॉट्सअॅप कॉल करून नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी www.shreeortho.in या संकेतस्थळावर भेट देता येईल, असेही त्यांनी सांगितले.









