माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य
सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा उद्या वाढदिवस आहे . त्यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या भाजपचे जिल्हा युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पुरोहित यांच्याकडून करण्यात आले आहे .









