आचरा प्रतिनिधी
आचरा येथील श्री शिवकृपा युवा मंडळ आचरा पारवाडी यांनी आचरा तिठा श्री गणराज इलेक्ट्रिक दुकान शेजारी (हॉटेल प्रसाद कावले यांच्या समोर) येथे गुरुवार दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक ९.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या वेळेत आचरा पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क मुकेश सावंत ९४२१२३७७६३, चंद्रकांत कदम ९४०३०७१६७९ यांच्याकडे करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.









