प्रतिनिधी/सावंतवाडी-
रोटरी क्लब चॅरिटेबल ट्रस्ट व व्हिजन आरएक्स लॅब प्रा. लिमिटेड आयोजित मोफत नेत्रतपासणी शिबीर 4 जूनला आयोजित केले आहे. रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी, इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी, रोट्रॅक्ट क्लब सावंतवाडी, युवा रक्तदाना संघटना सावंतवाडी, मुिस्लम हेल्थ अँड वेल्थफेअर फाउंडेशन सावंतवाडी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चितारआळी व सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन केले आहे. रोटरी ट्रस्ट इमारत, साधले मेससमोर, राजवाडय़ानजीक होणाऱया या शिबिराचा 40 वर्षावरील सर्व व्यक्तींना लाभ घेता येणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत हे शिबीर होणार आहे. तपासणीनंतर निदान झालेल्या व्यक्तींना मोफत चष्मे पुरविले जाणार आहेत. मोफत नेत्र चिकित्सा तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी सुवर्ण महोत्सवी वर्ष अध्यक्ष साईप्रसाद हवालदार यांनी केले आहे.









