वार्ताहर / तुडये
मराठा मंडळ डेंटल कॉलेज, बेळगावच्या डॉक्टरांनी सुरुते (ता. चंदगड) येथील मराठी विद्यामंदिरच्या 220 विद्यार्थ्यांची मोफत दंत चिकित्सा केली. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भरमू आपटेकर होते. सरपंच मारुती पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
मुख्याध्यापक नामदेव चौगुले यांनी प्रास्ताविक केले. डॉक्टरांनी दातांची निगा राखण्याबाबत माहिती दिली. यावेळी 220 विद्यार्थी आणि 120 माता-पित्यांची तपासणी केली. यापुढेही आरोग्यविषयक तपासणी शिबिरे आयोजित करणार असल्याचे शशिकांत सुतार यांनी सांगितले. डॉ. परशराम झंगरूचे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. समीर सूर्यवंशी, डॉ. निनाद सगरे, डॉ. मोनीशा, डॉ. झेबा, डॉ. यास्मीन, डॉ. मानसी, डॉ. सुतार यांनी दातांची तपासणी केली. सूत्रसंचालन शशिकांत सुतार यांनी केले. पांडुरंग बेकवाडकर, कल्लाप्पा एकणेकर, सुरेश पाटील, तानाजी नाईक आणि शिक्षक उपस्थित होते.









