सावंतवाडी । प्रतिनिधी
श्री जाणता राजा प्रतिष्ठान मंडळ नेमळे यांच्या वतीने गुरुवार दि 6 मार्च रोजी रात्री 9 वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट विनामूल्य मोठया पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. नेमळे देऊळवाडी येथे सातेरी मंदिर समोर शिव स्मारकाच्या बाजूला स्क्रीनचे आयोजन करण्यात आले असून सर्व शिवप्रेमींनी चित्रपटाचा लाभ घ्यावा असे आवाहन जाणता राजा प्रतिष्ठान मंडळ नेमळेच्या वतीने करण्यात आले आहे.









