नेत्रदर्शन सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटलचे सहकार्य
बेळगाव : लोककल्प फाऊंडेशन आणि नेत्रदर्शन सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटल (युनिट ऑफ डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल) अनगोळ कॉर्नर यांच्या सहकार्याने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने दत्तक घेतलेल्या आमगाव गावातील रहिवासी सावित्री गावकर यांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. लोककल्प फाऊंडेशनद्वारे सामाजिक जबाबदार उपक्रम योजनेखाली घेतलेल्या शिबिरात त्यांच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाल्याचे निदान झाले होते. लोककल्प फाऊंडेशन आणि डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलच्या नेत्रदर्शन सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटल युनिटच्या संयुक्त प्रयत्नाने सावित्री गावकर यांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गावकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले, की माझी दृष्टी पूर्ववत केल्याबद्दल मी लोककल्प फाऊंडेशन आणि डॉ. अग्रवाल हेल्थकेअर लिमिटेडची मन:पूर्वक आभारी आहे. या शस्त्रक्रियेने माझे जीवन बदलले असून मी आता स्पष्टपणे पाहू शकेन, असे सांगून लोककल्पच्या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.









