मिरज प्रतिनिधी
येथील आयसीआयसीआय बँकेत क्रेडीट कार्डधारक ग्राहकांच्या खात्यावरील 13 लाख, 86 हजार, 123 ऊपयांचा अपहार कऊन ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँक व्यवस्थापक विजय प्रकाश पळसुले (वय 42, रा. राधाकृष्ण सिध्द बटुकेश्वर कॉलनी, चंबुकडी, कोल्हापूर) यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित कर्मचारी भरत अशोक कोळी (वय 39, रा. व्यंकटेश कॉलनीमागे, बागेवाडी चाळ, जवाहरनगर, इचलकरंजी) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
फसवणूक प्रकरणी 23 ग्राहकांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. या सर्व ग्राहकांची सुमारे 50 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप केला जात होता. मात्र, बँकेने प्रत्येक ग्राहकांची स्वतंत्र चौकशी केली असून, त्यातून जानेवारी ते जुलैपर्यंत 13 लाख, 86 हजार, 123 ऊपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार तक्रारदार ग्राहक आणि बँकेच्या वतीने व्यवस्थापकांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली आहे. संशयित आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सांगली रस्त्यावरील वंटमुरे कॉर्नरजवळ असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या मिरज शाखेत संशयित भरत कोळी या कर्मचाऱ्याने ग्राहकांशी ओळख केली. ग्राहकांचा विश्वास संपादन कऊन क्रेडीट कार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक मिळविला. त्यानंतर क्रेडीट कार्डला दुसरा मोबाईल क्रमांक लिंक कऊन नेट बँकींगच्या आधारे पैसे काढून घेतले. क्रेडीट कार्डधारकांना बँकेकडून क्रेडीट कार्डच्या हफ्त्यासंदर्भात विचारणा झाल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आला. त्यानंतर ग्राहकांनी बँकेत तक्रार केली. तेव्हापासून भरत कोळी गायब आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर बँकेच्या मुंबई शाखेतील वरिष्ठ अधिकारीही मिरज शाखेत आले. त्यांनी फसवणूक झालेल्या सर्व ग्राहकांची स्वतंत्रपणे चौकशी केली. यावेळी सुमारे 23 तक्रारदारांनी 50 लाखांची फसवणूक झाल्याचा दावा केला होता. मात्र, बँक अधिकाऱ्यांनी पुराव्यानिशी केलेल्या चौकशीतून 13 लाख, 86 हजार, 123 ऊपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार फसवणूक झालेले ग्राहक तसेच बँकेच्या वतीने व्यवस्थापकांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सुरू आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








