वृत्तसंस्था/ न्यूपोर्ट (अमेरिका)
एटीपी टूरवरील येथे झालेल्या हॉल ऑफ फेम पुरुषांच्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद फ्रान्सच्या अॅड्रीयन मॅनारिनोने पटकाविले. अंतिम सामन्यात त्याने अमेरिकेच्या अॅलेक्स मिचेलसनचा पराभव केला.
35 वर्षीय मॅनारिनोने अंतिम सामन्यात मिचेलसनचा 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. या सामन्यात मॅनारिनोने आपल्या वेगवान सर्व्हिस आणि बेसलाईन खेळावर अधिक भर दिला होता.









