वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी
डब्ल्यूटीए टूरवरील रविवारी येथे झालेल्या सिनसिनॅटी मास्टर्स महिलांच्या टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाने झेक प्रजासत्ताकच्या पेत्र क्विटोव्हाचा पराभव करत एकेरीचे अजिंक्मयपद पटकाविले.
रविवारी येथे झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात गार्सियाने क्विटोव्हाचा 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. फ्रान्सच्या गार्सियाचे डब्ल्यूटीए टूरवरील मास्टर्स स्पर्धेतील हे तिसरे तर तिच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील दहावे अजिंक्मयपद आहे. पाच वर्षांपूर्वी गार्सियाने वुहान आणि बीजिंग येथे झालेल्या मास्टर्स टेनिस स्पर्धेत अजिंक्मयपदे मिळविली होती. गार्सियाने हा अंतिम सामना 96 मिनिटात जिंकला.









