वाणिज्य मंत्रालयाची माहिती : पुढील आठवड्यात व्यापार विषयक दौरा
नवी दिल्ली :
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल पुढील आठवड्यात व्यापारी संबंध मजबूत करण्यासाठी फ्रान्स आणि इटलीचा दौरा करणार असून दौऱ्यात दोन्ही देशांतील व्यावसायिक नेते आणि नेत्यांच्या अनेक बैठका घेणार असल्याची माहिती आहे. गोयल 11 ते 13 एप्रिल दरम्यान फ्रान्स आणि इटलीच्या दौऱ्यावर असतील, असे वाणिज्य मंत्रालयाने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे.
प्रमुख भारतीय कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे (सीईओ) शिष्टमंडळ त्यांच्यासोबत असेल. गोयल 11 एप्रिल रोजी फ्रान्सचे विदेश व्यापार मंत्री ऑलिव्हियर बेख्त यांच्यासमवेत भारत-फ्रान्स बिझनेस समिटचे सह-अध्यक्षपद भूषवतील. या परिषदेत ग्रीन भविष्य, नवीन तंत्रज्ञान, संरक्षण सहकार्य आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य यासारख्या मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. गोयल फ्रेंच व्यावसायिक दिग्गजांनाही भेटणार आहेत आणि सीईओंच्या बैठकीला हजर राहणार असल्याची माहिती आहे.









