कट्टरवाद्यांची यादी तयार : आश्रय मागणाऱ्यांची संख्या घटणार : धार्मिक स्थळांना मिळणाऱ्या निधीची होणार चौकशी
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्समध्ये आता धार्मिक स्थळांना मिळणाऱ्या निधीची चौकशी केली जाणार आहे. दहशतवाद आणि कट्टरवादावर नजर ठेवणाऱ्या फ्रेंच वॉच लिस्टनुसार काही धार्मिक ठिकाणी शिक्षणाच्या नावाखाली कट्टटरवादी मानसिकतेला बळ पुरविले जात आहे. प्रेंच सरकारने धार्मिक फंडिंगच्या चौकशीसाठी 2,450 मशिदींची यादी तयार केली आहे.
फ्रान्सने स्वत:च्या देशातील दहशतवाद रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. आश्रयाच्या नावावर फ्रान्समध्ये राहत असलेल्या 20 हजारांहून अधिक मुस्लीम कट्टरवाद्यांना देशातून हाकलण्याची तयारी केली जात आहे. फ्रान्सच्या गृह मंत्रालयाने हे पाऊल अलिकडेच एका शिक्षकाची चाकूने वार करत हत्या करण्यात आल्यावर उचलले आहे. यातील आरोपी युवक हा मुस्लीम असून तो कट्टरवादाने प्रेरित होता.
रशियासमवेत पूर्व युरोपीय देशांमधून आश्रय मागण्याच्या नावाखाली मोठ्या संख्येत लोक फ्रान्समध्ये स्थायिक होत आहे. हे समाजकंटक फ्रान्सच्या लोकशाहीवादी व्यवस्थेचा गैरफायदा घेत कट्टरवादाला बळ पुरवित असल्याचे गृह मंत्रालयाचे मानणे आहे. फ्रान्सने 2017-21 या कालावधीत 7 लाख लोकांना आश्रय दिला आहे. यातील 6 लाख जण हे पाकिस्तान, सीरिया, लीबिया, मोरक्को आणि क्रोएशियाचे नागरिक होते. आता सरकारने आश्रय मागणाऱ्यांची संख्या दरवर्षी एक लाखाच्या सरासरीवरून कमी करत 75 हजार करण्याची घोषणा केली आहे.
पूर्ण बुरख्यावर बंदी
फ्रान्सने 2 महिन्यांपूर्वी शासकीय शाळांमध्ये मुलींच्या अबाया परिधान करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. फ्रान्सचे शिक्षणमंत्री गॅब्रिएल एटॉल यांनी शासकीय शाळांमध्ये अबाया परिधान करण्यावर बंदी असल्याचे स्पष्ट केले आहे. जेव्हा तुम्ही वर्गात जाता तेव्हा तुमचे कपडे हे धार्मिक ओळख व्यक्त करणारे नसावेत. हे पाऊल फ्रेंच शाळांमध्ये अबाया परिधान करण्याच्या मुद्द्यावर दीर्घकाळ चर्चा झाल्यावर उचलण्यात आले आहे. तर महिलांच्या हिजाब परिधान करण्यावर दीर्घकाळापासून बंदी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.