हिंद-प्रशांत क्षेत्रातील मोर्चेबांधणी मजबूत ः चीनचे टेन्शन वाढणार
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्स देखील ऑकस पाणबुडी कार्यक्रमाचा हिस्सा असणार आहे. आघाडीच्या विस्तारायच योजनेंतर्गत फ्रान्सने देखील या संघटनेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. ऑकस अंतर्गत आता ऑस्ट्रेलियासह फ्रान्स आणि ब्रिटनसाटी आण्विक पाणबुडय़ांची निर्मिती होणार आहे. अमेरिकेकडून या पाणबुडीसाठी सामग्री उपलब्ध केली जाणार आहे.
13 मार्च रोजी अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाकडून या कराराच्या विस्तारासंबंधी घोषणा करण्यात आली होती. हिंद-प्रशांत क्षेत्रात चीनच्या वाढत्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशाने ऑकस भागीदारी सुरू करण्यात आली होती. फ्रान्सने प्रारंभी या आघाडीत सामील होण्यास नकार दिला होता. परंतु आता फ्रान्स देखील या आघाडीत सामील होत असल्याने चीनचे टेन्शन वाढणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत 368 अब्ज डॉलर्सच्या निधीतून आण्विक पाणबुडय़ांची निर्मिती केली जणार आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि ब्रिटनने आखलेल्या योजनेनुसार या आघाडीत सामील देशांच्या नौदलांसाठी आण्विक क्षमतेने युक्त पाणबुडय़ांची निर्मिती केली जाणार आहे.
नव्या योजनेनुसार फ्रान्सच्या नौदलाला 4 पाणबुडय़ा प्राप्त होणार आहेत. फ्रान्ससाठी पाणबुडय़ांची निर्मिती ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनप्रमाणेच केली जाणार का प्रेंच पाणबुडय़ा वेगळय़ा स्वरुपाच्या असणार याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. 14 मार्च रोजी ऑकस आघाडी अंतर्गत निर्माण होणाऱया पाणबुडय़ांची काही छायाचित्रे समोर आली होती. या पाणबुडय़ांना प्रेंच स्टाइलमध्ये डिझाइन करण्यात आले होते. पाणबुडय़ा फ्रान्सच्या बाराकुडा क्लास पाणबुडय़ांप्रमाणे दिसून येत होत्या.
बाराकुडा शेणीच्या पाणबुडय़ा लवकरच प्रेंच नौदलात सामील होणार आहेत. नव्या व्यवस्थेनंतर अनेक अब्ज डॉलर्सची बचत होणार असल्याचे मानले जात आहे. नव्या पाणबुडय़ा साउथहॅम्पटन किंवा चेरबर्गदरम्यान एका नव्या केंद्रात तयार केल्या जाणार असल्याचे मानले जात आहे. याच ठिकाणी फ्रान्स स्वतःच्या पाणबुडय़ांची निर्मिती करत असतो.
ऑस्ट्रेलियासाठीच्या पाणबुडय़ांची निर्मिती ऑस्ट्रेलियन यार्डमध्ये केली जाईल आणि मग फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये त्याच्या पार्टस्ची जोडणी केली जाणार आहे. या पाणबुडय़ांना सुएज कालव्याच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियात पाठविण्यात येणार आहे. या नव्या सुधारित कार्यक्रमाला आता फुकस म्हटले जाणार आहे. फ्रान्स या आघाडीत सामील झाल्याने ब्रिटनची चिंता दूर झाली आहे.









