भारतातील प्रकल्पात होणार उत्पादन : सप्टेंबरमध्ये आयफोनचे सादरीकरण शक्य
नवी दिल्ली :
अॅपल पुरवठादार फॉक्सकॉनने भारतातील आपल्या तामिळनाडू प्लांटमध्ये आयफोन 15 चे उत्पादन सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फॉक्सकॉन काही आठवड्यांत नवीन उपकरण देण्याची तयारी करत आहे. भारतातील आयफोन उत्पादन मोठ्या प्रमाणात आयात केलेल्या भागांच्या उपलब्धतेवर अवलंबून राहणार असल्याची माहिती आहे.
उत्पादनाला गती देण्यासाठी
उत्पादनाला गती देण्यासाठी, चेन्नई प्लांटमधील उत्पादन क्षमता वाढवण्यात आली आहे. कंपनी 12 सप्टेंबर 2023 रोजी नवीन आयफोन 15 सीरीजची घोषणा करू शकते. फॉक्सकॉन डिसेंबर 2024 पर्यंत हैदराबाद प्लांटमध्ये सुमारे 3,300 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करेल अशी अपेक्षा आहे.
यासंबंधीत मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील इतर अॅपल पुरवठादार -पेगाट्रॉन कॉर्प आणि विस्ट्रॉन कॉर्प टाटा समूहाने अधिग्रहित केलेला कारखाना – लवकरच आयफोन 15 असेंबल करतील. अॅपलचे प्रवत्ते आणि विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉनच्या प्रतिनिधींनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. दरम्यान, फॉक्सकॉनने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. अधिक उच्च-गुणवत्तेची उत्पादने आणण्यासाठी मोदी प्रशासनाकडून मिळालेल्या काही आर्थिक सवलतींचा फायदा घेऊन अॅपलने आपल्या तैवानच्या पुरवठादारांद्वारे भारतात व्यवसायाचा सातत्याने विस्तार केला आहे.
तिप्पट उत्पादन
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अॅपलने मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात भारतात आयफोनचे उत्पादन तिपटीने वाढवून 7 अब्ज डॉलरपेक्षा जास्त केले आहे. एप्रिलमध्ये देशातील पहिले रिटेल स्टोअर उघडणारे अॅपल आता वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेवर बारीक लक्ष ठेवून आहे. अॅपलच्या उत्पादनांना आगामी काळात मागणीत वाढीची आशाही कंपनीकडून व्यक्त केली जात आहे.
दू









