मुंबई :
तैवानी इलेक्ट्रॉनिक कंपनी फॉक्सकॉनने आपल्या आयफोन-17 च्या निर्मिती कार्याला पुन्हा नुकतीच सुरुवात केली आहे. कंपनीच्या बेंगळूरच्या कारखान्यामध्ये आयफोन-17 चे उत्पादन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. जागतिक स्तरावर पाहता दुसऱ्या नंबरची निर्मिती कंपनी म्हणून फॉक्सकॉनचा उल्लेख केला जातो. बेंगळूरच्या देवनहळळीत कंपनीचा उत्पादन कारखाना असून त्यामध्ये जवळपास 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. चीननंतर हा दुसरा सर्वात मोठा कारखाना मानला जात आहे. फॉक्सकॉनच्या चेन्नई कारखान्यामध्येही आयफोन-17 ची निर्मिती केली जात आहे. अलीकडच्या काळात जवळपास कित्येक चिनी अभियंते काम सोडून गेले होते. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता. आता फॉक्सकॉनच्या बेंगळूर येथील कारखान्यात पुन्हा उत्पादनाला सुरुवात झाली आहे.









