प्रतिनिधी/मिरज
तालुक्यातील सोनी येथे दोन दिवसांपासून कोल्ह्याने धुमाकूळ घातला असून आठ जणांना चावा घेतला आहे. काही जनावरांवरही हल्ला केला आहे. यामुळे शेतकऱ्यामध्ये भीतीमध्ये वातावरण आहे. वन विभागाने या कोल्ह्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
सोनी येथे दोन दिवसांपासून शेतामध्ये कोल्हय़ाचे वास्तव्य असून शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर कोल्ह्य़ाने हल्ला करून चावा घेतला आहे. यामध्ये आठ जण जखमी झाले आहेत. एका महिलेचा समावेश आहे. गावातील जनावरांनाही या काल्हय़ाने चावा घेतला आहे. याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. शुक्रवारी दुपारी वनखात्याने कर्मचारी गावात आले. त्यांनी शेतात जाऊन ठशांची पाहणी केली. सदर ठसे कोल्हासदृश्य प्राण्याचे असल्याचे सांगण्यात आले. या कोल्ह्य़ाने दोन दिवस गावातील शेतांमध्ये मुक्काम ठोकला असून शेतात काम करणाऱया शेतकरी आणि मजूरांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. या कोल्हय़ाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.








