बेळगाव :
पाटील मळा येथील युवकाच्या खूनप्रकरणी कोल्हापूर येथील आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या चारवर पोहोचली आहे. खडेबाजार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
रविसिंग प्रकाश रजपूत (वय 35) रा. कोल्हापूर असे त्याचे नाव आहे. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी, उपनिरीक्षक आनंद आदगोंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. आदित्य दीपक धामणेकर (वय 24), त्याची आई वंदना धामणेकर (वय 45), वंदनाचा भाऊ हरिओम अनंत खाडे (वय 39) रा. आनंदवाडी यांनाही अटक झाली आहे. बुधवार दि. 26 मार्च रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पाटील मळा येथील अनिल शरद धामणेकर (वय 46) याचा मिळकतीच्या वादातून चाकूने वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी एकूण चौघा जणांना अटक करण्यात आली आहे.









