देवगड :
वर्षा पर्यटनासाठी देवगडला गेलेल्या मालवण तालुक्यातील आचरा येथील चौघा तरुणांवर काळाने घाला घातल्याने संपूर्ण जिल्हा शुक्रवारी हेलावून गेला. आचरा येथील सुमारे १५ रिक्षा व्यावसायिक वर्षा पर्यटनासाठी देवगड तालुक्यात गेले होते. मशवी येथे त्यांनी एकत्रित स्नेहभोजनही केले. त्यानंतर ते सर्वजण आचरा येथे माघारी परतले. मात्र, त्यातील रिक्षा चालक संकेत घाडी, संतोष गावकर, सोनू कोळंबकर, रोहन नाईक, रघुनाथ बिनसाळे पुन्हा रिक्षाने देवगडच्या दिशेने आले आणि त्यांच्यातील चौघांवर काळाने घाला घातला.
तालुक्यातील नारिग्रे-कोटकामते मार्गावर नारिंग्रे स्मशानभूमीनजीक अचानक समोरून आलेल्या एसटीला बाजू देताना रिक्षेची एसटीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकासह रिक्षेतील चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये रिक्षाचालक संकेत सदानंद घाडी (२९, आचरा देऊळवाडी), संतोष रामजी गावकर (३३. आचरा गाऊडवाडी), सुनिल उर्फ सोनू सूर्यकांत कोळंबकर (४८, आचरा पिरावाडी), रोहन मोहन नाईक (२९, आचरा गाऊडवाडी) यांचा समावेश आहे. तर रघुनाथ रामदास बिनसाळे (५०, आचरा भंडारवाडी) हे गंभीर जखमी झाले. हे सर्वजण आचरा येथील रिक्षाव्यावसायिक असून ते वर्षा पर्यटनासाठी देवगड तालुक्यात आले होते. हा अपघात शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, देवगड आगारातून शुक्रवारी दुपारी २.३० वा. सुटलेली विजयदुर्ग-मालवण ही बसफेरी संकेत घाडी नारिंग्रे-कोटकामते मार्गावरून मालवणच्या दिशेने जात होती. या एसटीवर संदीप अनंत माळगावकर हे चालक, तर डी. एम. भेले हे वाहक म्हणून सेवा बजावत होते. तर आचरा येथील रिक्षा व्यावसायिक संकेत घाडी हे आपल्या ताब्यातील रिक्षेतून संतोष गावकर, रोहन नाईक, सोनू कोळंबकर, रघुनाथ बिनसाळे यांच्यासमवेत नारिग्रे-कोटकामते रस्त्यावरून प्रवास करीत होते. दुपारी ३.४५ वा. च्या सुमारास नारिंग्रे स्मशानभूमीनजीकच्या चढ-उताराच्या वळणावरील रस्त्यावर दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास नायेि स्मशानभूमीनजीकच्या चढ-उताराच्या वळणावरील रस्त्यावर संकित घाडी यांची रिक्षा आली. यावेळी अचानक समोरून आलेल्या एसटीत्ता बाजू देताना घाडी यांचा रिक्षावरील ताबा सुटता आणि रिक्षा उत्तदून एसटीला जाऊन थडकली. ही धडक एवढी भीषण होती की, चालक संकेत, संतोष, सोनू हे जागीच गतप्राण झाले. तर रोहन, रघुनाथ हे गंभीर अवस्थेत रिक्षामध्ये अडकले होते. या अपघाताचे वृत्त परिसरात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ मदतकार्य राबविले गंभीर जखमी दोघांना मिठबावच्या रामेश्वर प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखत केले. मात्र, रोहन नाईक यांचा वाटेतच मृत्यू झाला. तर रघुनाथवर देवगड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी बांबोळी-गोवा येथे हलविण्यात आले. बिनसाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणात झाला आहे.
- देवगड पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच मिठबाव सरपंच भाई नरे शैलेश लोके, काका नरे यांच्यासह मिठबाव, नारिंगे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पोलीस हवालदार आशिष कदम, प्रवीण सावंत, नीलेश पाटील, स्वप्नील ठोंबरे, योगेश महाले, नितीन डोईफोडे, गणपती गावडे आदींनी घटनास्थळी जात पंचनामा केला.
- आचरावासीय मोठ्या संख्येने देवगडला दाखल
अपघातातील मृतदेह विच्छेदनासाठी मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या अपघाताची माहिती आचरा गावात पसरताच मोठ्या संख्येने आचरावासीय मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जमा झाले. मृतांचे नातेवाईकही मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. त्यांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी आचरा सरपंच जेरोम फर्नांडिस, शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे यांच्यासह आचरा येथील रिक्षा व्यावसायिक, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








