पन्हाळा-प्रतिनिधी
Kolhapur Accident News : कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील वाघबीळ घाटातील नलवडे बंगल्याजवळील वळणावर चारचाकी गाडी दरीबाजुला खाली गेली.या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी एकजण जखमी झाले आहे. योगेश ओमप्रकाश राव (वय -२८) असे जखमीचे नाव आहे. याबाबतची करवीर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
घटनास्थळांवरुन मिळालेली अधिक माहिती अशी, कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाघबीळ घाटातील नलवडे बंगल्याजवळील वळणावर औषधांचा माल घेऊन चारचाकी गाडी बांबवडे (ता.शाहुवाडी) येथून दुपारी कोल्हापूरडे चालली होती. नलवडे बंगल्याजवळी वळणावर आल्यावर समोररून ओव्हरटेक करण्याऱ्या वाहनाला चुकवता चारचाकी गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी वळणावरून थेट दरीत गेली. गाडीतील चालक सतिश देवराज सिंग (वय -४८ रा.उत्तरप्रदेश) यांना आणि जखमी योगेश राव यांना बाहेर काढून उपचारासाठी केर्ले येथील खाजगी दवाखान्यात पाठवले.









