बेलबाग येथील घटना
कोल्हापूर
बेलबाग येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. शॉर्ट सर्किटमुळे वायरिंगने पेट घेतल्याने काही मिनिटात आग सर्वत्र पसरली. मध्यरात्री आफताब देसाई, फाजल पठाण, जुबेर मोमीन आणि रेहान गवंडी हे घरी जात असताना वाहनाने पेट घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती टिंबर मार्केट येथील अग्निशमन दलास दिली. अग्निशमन दलाने अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमध्ये मोटारीचे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दीड महिन्यांपासून ही गाडी रस्त्याकडेला लावून होती. अग्निशामक दलाचे फायरमन संग्राम मोरे, प्रवीण ब्रह्मदंडे, संदीप उन्हाळकर यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
Previous Article‘म्युझिकल’, ‘हेरिटेज’ पोलला अखेर मुहूर्त
Next Article हाफ मॅरेथॉनमध्ये धावले रत्नागिरीकर !








